पुरस्कार

  • गावाला २००६/२००७ साली जिल्हा स्तरीय डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिकतेचा पुरस्कारमिळाला आहे.
  • तसेच २००२, २००३ व २००६ मध्ये संत गाडगे बाबा स्वच्छता अभियान कार्यक्रमाचे प्रथम व द्वितीय क्रमांकाचे जिल्हा स्तरीय पुरस्कार मिळाले आहेत.
  • गांव निर्मलग्राम होऊन बक्षिसपात्र ठरले आहे. महात्मा गांधी तंटामुक्ती अभियान गावात उत्कृष्ट प्रकारे राबविले त्यामुळे नागरिकांची आपआपसातील भांडणे समझोत्याने मिटविण्यात आली. त्यामुळे पोलीस स्टेशनकडे जाणाया नागरिकांची संख्या अत्यंत कमी झाली. परिणामी गांवात शांतता निर्माण झाली. गावास तंटामुक्त गांव म्हणून घोषीत होऊन गांव बक्षिसपात्र झाले.