राजकीय

राजकीय व्यक्तिमत्वे-

 • नामदेव कृष्णाजी तावदर (अण्णा):-
  • सन १९७२ ते १९८१ या काळात सलग १० वर्षे सरपंच पदावर उत्कृष्ट रित्या काम केले. गावात लाईट व नळपाणि पुरवठयाची व्यवस्था केली. तासगांव पंचायत समितीचे सदस्य म्हणून १९९५ ते २००० या काळात काम केले. गावात महात्मा गांधी तंटामुक्त अभियान राबवून गांव तंटामुक्त केले.
 • पांडुरंग यशवंत पाटील (दादा):-
  • गावात प्रथम धान्य दुकानाची उभारणी केली. ग्रामपंचायत स्थापनेनंतर प्रथम सरपंच म्हणून काम केले. माळवाडी सेवा सहकारी सोसायटीची स्थापना १९६२ रोजी केली. सन १९६७ ते ७३ मध्ये पंचायत समिती तासगांव चे सदस्य व मार्केट कमिटी ८२ ते ८५ अखेर सदस्य १९६० साली माळवाडीत विकास गटाची स्थापना करून शाळा बांधकाम व अडामधून पिण्याच्या पाण्याची कामे व देखरेख केली.
 • सहदेव पांडुरंग कदम (भाऊ):-
  • १९९० ते १९९५ काळात ग्रामपंचायतीचे सरपंच. सरपंच पदाच्या काळात सामान्य जनतेची कामे केली. भिलवडी शिक्षण संस्थेत संचालक पलूस सह. बँकेत सल्लागार तसेच द.भा.वि.का.का.सोसायटी बिनविरोध संचालक म्हणून कामकाज करतात.
 • व्यंकोजी बाळु जाधव (अण्णा):-
  • सन १९९५ ते २००० या काळात सरपंच म्हणून सामान्य जनतेची कामे केली.
 • आनंदा बाळु माळी (भाऊ):-
  • १९९५ ते २००० या काळात ग्रामपंचायत सदस्य तसेच २००० ते २००४ पर्यंत सरपंच पदावरती उत्कृश्ठ काम. प.स. पलूस चे पहिले सदस्य म्हणून त्यांची निवड करण्यात आली.
 • आनंदा भाऊ कदमः-
  • सेवा सहकारी सोसायटीत चेअरमन व तत्कालीन ग्रामपंचायत उपसरपंच म्हणून समाजाची कामे केली.
 • शैलजा ईश्वर चौधरीः-
  • प्रथम महिला सरपंच म्हणून सन १९९५ ते २००० या काळात काम केले.
 • विनायक बाळु भोळेः-
  • माळवाडी गावचे विद्यमान सरपंच-शुध्द व पुरेशा दाबाने पिण्याच्या पाण्यासाठी अहोरात्र काम करणारे व्यक्तिमत्व म्हणून परिचित. नविन वसाहतींना व दुर्लक्षीत विभागांना पिण्याच्या पाण्याची पाईपलाईन टाकून सोय करून देणारे अभ्यासू व्यक्तिमत्व. गांव तंटामुक्त करण्यास सक्रिय सहभाग.
 • संताजी बबन जाधव (आप्पा):-
  • गावच्या इतिहासातील एक आदर्श युवा नेतृत्व. तळागाळातील लोकांची सेवा करण्याची उमेद बाळगणाया आप्पांनी वयाच्या २३ व्या वर्षी माळवाडीचे सरपंच पद भुषविले व ख-या अर्थाने विकास कामाचा वेग वाढला. युवा पिढीला एकत्र करून सार्वजनिक व सामाजिक सांस्कृतिक कामात जबाबदार व्यक्ती म्हणून संपूर्ण गांव त्यांच्याकडे आशाळभूत नजरेने बघतो. सध्या प.स.पलूस चे सदस्य म्हणून कार्यरत.