रोजगाराची

गावातील प्रमुख व्यवसाय हा द्योती आहे. परंतु बहुतांशी ८० % लोकांना जमीन नाही. तरी ते इतरांच्या शेतीवरती शेतमजूर म्हणून काम करतात. त्याबरोबर दुग्ध व्यवसाय ही मोठया प्रमाणात केला जातो. त्यातून रोजगाराची उपलब्धता होते. यासाठी चितळे डेअरी, पाटील डेअरीचे मोलाचे सहकार्य ग्रामस्थांना मिळते. कृष्णानदीवरून लिफ्ट एरिगेशनच्या माध्यमातून पाणी मिळते. त्यामुळे गाव हिरवेगार व धनधान्य समृध्द आहे. द्योतीत ऊस, द्राक्षे बागा, भाजीपाला, कांदे, टोमॅटो, इ. उत्पादन घेतले जाते. द्राक्ष व्यवसायात प्रामुख्याने युवक वर्ग काम करीतअ आहेत.

येथील तरूण आधुनिकतेची कास धरणारा असल्यामुळ फुलशेती ही मोठया प्रमाणात केली जाते. येथील फुलांना मुंबई बाजारपेठेत मागणी आहे.

उद्योग-

  • गावात पृथ्वीराज देशमुख यंत्रमाग सहकारी संस्था असून व पाटील डेअरी व चितळे डेअरीच्या माध्यमातून स्थानिक लोकांना रोजगार उपलब्ध झाला आहे.

स्वयंरोजगार-

गावातील अनेक तरूणांनी रिक्षा, जीप घेवून स्वयंरोजगार सुरू केले आहेत. तसेच शेवई, मिरची कांडप यंत्रे, फ्लोअरमिल, खादयपदार्थ तयार करणे, इत्यादी वयवसाय अनेक जण करीत आहेत. बचत गटाच्या माध्यमातून दुग्ध व्यवसायातून मोठया प्रमाणात रोजगार उपलब्ध झाला आहे.