माझे गांव

माळवाडी हे गांव टोप वडगांव शिगाव आष्टा तासगांव भिवघाट राज्यमार्ग क्र. १३६ वरती माळवाडी गांव वसले आहे. या गावात अठरा पगड जातीचे बारा बलुतेदार गुण्यागोविंदाने रहात असून गावात कधीही जातीय दंगली झालेल्या नाहीत. तसेच गावापासून ४ कि.मी. अंतरावर केंद्र सरकारचा वरदहस्त लाभलेला हिदुस्थान पेट्रोलियचा गॅस बॉटलींग प्लॅन्ट आहे. येथून सहा जिल्हयांना पेट्रोल जन्य पदार्थ व गॅसचा पुरवठा होतो. गावात इतिहाकालीन हनुमान मंदिर हिंदु-मुस्लीम ऐक्याचे प्रतिक असणारे मुस्लीम मशिद, सिध्दोबा मंदिर, लक्ष्मी देवालय आहे.