सुविधा

पायाभूत सुविधा-

 • गावातील मुख्य रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले आहे. गाव नविन (वाढीव) वसाहतींना जोडण्यासाठी खडी व मुरूमाचे रस्ते तयार केले आहेत. तसेच रस्त्यावरती विजेच्या दिव्यांची सोय केली आहे.
 • नागरीकांना पिण्याच्या पाण्यासाठी कृष्णानदीवरून पाणी पुरवठा योजना केली आहे. हे पाणी उंचावरील टाकीत साठविण्यात येते. त्यानंतर योग्य दाबाने व नियमित पाणीपुरवठा होतो. गाव राज्यमार्गावर असल्यामुळे एस.टी. बसेस ची प्रत्येक तासास सोय आहे. याशिवाय, प्रवासी जीप, रिक्षा दळणवळणाच्या सोई आहेत.

आरोग्य सुविधा-

 • गावात, हिवताप, माताबाल संगोपन, क्षयरोग नियंत्रण, कुष्ठरोग निर्मुलन, अंधत्व निवारण, कुटूंबनियोजन, यासारखे कार्यक्रम राबविले जातात.
 • शालेय विद्यार्थ्यांची आरोग्य तपासणी किशोर वयोगटातील मुलींची आरोग्य तपासणी, औषधोपचार आणि सल्ला दिला जातो.
 • जन्म, मृत्यु बालमृत्ये नोंदणी केली जाते.
 • घरोघरी भेट देऊन साथीच्या रोगाचे सर्वेक्षण केले जाते.
 • पिण्याच्या पाण्याची नमुण्यांची तपासणी केली जाते.
 • पल्स पोलीओ, जंतुनाशक आरोग्य शिबीराचे आयोजन केले जाते.
 • गावात आरोग्य दिन साजरा केला जातो.
 • गावात खाजगी चार दवाखाने आहेत. त्यात विविध प्रकारच्या आजारावर उपचार केले जातात.
 • गावात दोन औषधांची दुकाने आहेत.

शैक्षणिक सुविधा–

 • माळवाडीत उतरल्यानंतर दक्षिण बाजूस पाण्याच्या टाकीच्या पाठीमागे जि.प.मराठी शाळेची आर.सी.सी. इमारत आहे. तेथे पहिली पासून चौथीपर्यंत शिक्षण दिले जाते. स्वतःच्या जागेत चार अंगणवाडया आहेत. शाळेच्या विकासाबरोबर विद्यार्थ्यांना खेळाची आवड निर्माण व्हावी यासाठी पुरेशा प्रमाणात खेळाचे मैदान आहे. त्याचबरोबर खेळाचे साहित्यही आहे. चौथीच्या स्कॉलरशिपसाठी विद्यार्थ्यांकडून परीक्षेची तयारी विद्यार्थ्यांकडून तयार करून घेण्यासाठी शिक्षक शाळेच्या वेळेव्यतिरिक्त अथक परिश्रम घेतात. त्यामुळे या शाळेचे विद्यार्थी स्कॉलरशिप परीक्षेत चमकले आहेत.
 • माळवाडीत शासकीय शाळेबरोबर खाजगी आदर्श विद्यामंदिराची स्थापना झाली आहे. तेथे ज्युनिअर केजी. पासून ते ७ वी पर्यंत शिक्षणाची उत्तम सोय आहे. गावा पासून 1 कि.मी. अंतरावर भिलवडी शिक्षण संस्थेमध्ये माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षणाची सोय आहे.
 • शाळेचे अनेक विद्यार्थी डॉक्टर, अभियंते, शिक्षक, पोलीस, ऑफिसर, मुख्याध्यापक, राजकारणी, सैनिक, चांगले शेतकरी, तयार झालेले आहेत.

आठवडा बाजार-

1 कि.मी. अंतरावरील भिलवडी येथे दर रविवारी बाजार भरविला जातो. त्यामुळे येथील लोकांची तिथे भाजीपाला, धान्य, कपडे, फर्निचर, इ. खरेदी-विक्रीची चांगली सोय आहे.  गावाचा विस्तार वाढत असलेने माळवाडीत बाजार भरविण्याचया दृष्टीने नियोजन केले आहे.