धार्मिक व सांस्क्रतिक

धार्मिक व सांस्क्रतिक आणि मनोरंजनात्मक उत्सवः

हनुमान या ग्रामदैवताची यात्रा चैत्र पौर्णिमे दिवशी मोठया उत्साहात साजरी केली जाते. यात्रेनिमित्त घोडागाडी शर्यती, बैलगाडी, सायकल शर्यती चे आयोजन केले जाते. तसेच लक्ष्मी देवीची यात्रा ही मोठया उत्साहात साजरी केली जाते. यात्रेचे कायक्रम व वर्गणीबद्दल गावकयांची बैठक ही यात्रेची नोंद असते. यात्रा जवळ आली की, लहानापासून मोठया पर्यंतच्या उत्साहाला उधान येते. बाहेरगांवी नोकरी व्यवसायाच्या निमित्ताने गेलेले लोक, नातेवाईक आपतेष्ठ मित्र या निमित्ताने एकत्र येतात. यात्रेत कलापथक अथवा तमाशा/अशी कार्यक्रमाची रेलचेल असते. मावामध्ये दसरा उत्सव हा नवरात्र उत्सव म्हणून नऊ दिवस विविध कार्यक्रमाने साजरा करून पलूस तालुक्यात एक आदर्श नवरात्र उत्सव ठरलेला आहे. या उत्सवामध्ये सर्व जाती धर्माचे लोक उत्साहाने सहभागी होतात व कायक्रमाचा आनंद लुटतात.  दररोज सकाळी गावातील प्रमुख रस्न्माने शिवदौड त्यानंतर चितेन, समाजप्रबोधन पर असे कार्यक्रम तसेच सायकली ७ ते ८ या वेळेत गरबा, दांडिया इ. कार्यक्रम मोठया उत्साहाने साजरा केला जातो. महिलांची उपस्थिती मोठया प्रमाणात असते. हा उत्सव गेली १३ वर्षे अखंड चालू आहे. त्याचबरोबर

लक्ष्मीमंदिर-

  • वैशाख महिन्यात, शुक्लपक्षात यात्रा भरवली जाते.

रामोशी समाज (लक्ष्मी मंदिर)-

  • प्रत्येक वर्षी आषाड महिन्यात कृश्णपक्षात यात्रा भरवली जाते.

मरगुबाई मंदिर (लक्ष्मी)-

  • इतिहासकालीन मंदिर असून मंदिराचा जिर्णोद्वार १९७६ साली झाला. देवीची यात्रा आषाड महिन्यात कृश्णपक्षात असते. यावेळी विखुरलेला बागडी समाज एकत्र येतो व मोठया उत्साहात यात्रा साजरी केली जाते.

म्हासोबा-

  • डुक्कर तळयातील म्हासोबा देवस्थान हे हिंदु व महार समाजाचे कुलदैवत असून तो नवसाला पावणारा आहे.

सिध्दोबा-

  • सिध्दोबा मंदिर हे इतिहासकालीन असुन विजयादशमी दरम्यान यात्रा भरवली जाते.

१५ ऑगस्ट व २६ जानेवारी हे राष्ट्रीय सण ही मोठया उत्साहाने साजरे केले जातात. या राष्ट्रीय सणांना शाळेतील विद्यार्थी सांस्कृतिक कार्यक्रम, विविध कसरतीचे प्रयोग सादर करित असतात.